Monday, November 18, 2013

टीचर्स एलिजिबीलिटी टेस्ट 'टेट'साठी संगणक व माहिती तंत्रज्ञान

टीचर्स एलिजिबीलिटी टेस्ट 'टेट'साठी संगणक व माहिती तंत्रज्ञान

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व शिक्षकांची किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) सक्तीची करण्यात आली आहे. या पात्रता परीक्षेच्या सक्तीमुळे अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील संस्थाचालकांच्या मनमानी शिक्षक भरतीला आळा बसणार आहे.

शिक्षण विभागाची परवानगी न घेता परस्पर जाहिरात देऊन ज्यांनी जूनमध्येच शिक्षक भरती केली आहे असे संस्थाचालक आणि शिक्षक या निर्णयामुळे अडचणीत येणार आहेत. कारण ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011’ च्या कलमनुसार केंद्र शासनाने 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता सेवा शर्ती ठरवण्याकरिता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीईटी) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 23 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन आदेशात राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांकरिता किमान व्यावसायिक अर्हता तसेच शिक्षक पात्रता परीक्षा ‘टीईटी’ अर्थात ‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’ अनिवार्य केली आहे. यामुळे संस्थाचालकांची पैसे घेऊन शिक्षक भरती करण्याच्या बाजारीकरणास आळा बसेल. तसेच केवळ डीएड अथवा बीएड ही पदवी प्राप्त केली. म्हणजे शिक्षक झालो असे शिक्षकांना म्हणता येणार नाही. त्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पात्रता परीक्षा शिक्षकांना उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. हा नियम सर्व शिक्षण संस्थांसाठी लागू असणार आहे.

बिहारचा पायलट प्रोजेक्ट देशभरात
शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रथम केरळ आणि बिहार राज्यांत या परीक्षेची सुरुवात करण्यात आली. 2012 मध्ये बिहारमध्ये तत्कालीन मंत्री पी. के. शाही यांच्या वेळी झालेल्या परीक्षेत केवळ 5.5 टक्केच शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेत दोन पेपर घेण्यात आले होते.पहिला पेपर हा पहिली ते पाचवी आणि दुसरा पेपर हा सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित होता.

अशी होईल परीक्षा

0ही परीक्षा एनसीटीई राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेतर्फे घेतली जाईल.

0पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.

0डीएड व बीएड झालेल्यांसाठी वेगवेगळे प्रश्न असतील.

0कनिष्ठ प्राथमिक शिक्षक (पहिली ते पातवी) आणि वरिष्ठ प्राथमिक शिक्षकांसाठी (सहावी ते आठवी ) दोन स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील.

0दोन्ही गटांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवणे बंधनकारक असेल.

0परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण प्राप्त करणार्‍या उमेदवारास (अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, एसबीसी, एनटी व अपंगांसाठी 55 टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.

0ही परीक्षा सहा महिन्यांनी अथवा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. अद्याप त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. दरवर्षी शिक्षकांच्या आवश्यकतेनुसार ही परीक्षा होणार आहे.

असा होईल फायदा
0गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करण्यास मदत मिळेल.
0परीक्षेतून खरा गुणवंत समोर येईल.
0प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत मिळेल.
0संस्थाचालकांच्या मनमानी कारभारास तसेच पैसे घेऊन शिक्षक भरतीस आळा बसेल.



No comments:

Post a Comment